Eknath Shinde Interview : मविआ सरकारने भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं होतं; CM एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

Eknath Shinde Interview :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे. 'तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काही मंत्र्यांना अटक करण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राला मुलाखत देताना हा गौप्यस्फोट केला आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, 'उद्धव ठाकरे यांनी यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी ही देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक करणार होते, असेही शिंदे म्हणालेत.

Pune Politics : पुण्यातील राजकारणात मोठी घडामोड; काँग्रेस नेत्याच्या हकालपट्टीची मागणी, भाजपच्या वाटेवर असल्याची होती चर्चा

याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाबाबत स्पष्ट केलं की, शिवसेना राज्यात १६ जागांवर निवडणूक लढणार आहे. यात मुंबईतील ३ जागांचा समावेश आहे. राज्यातील जागावाटपांवरून कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही २०१९ साली ४२ जिंकल्या होत्या, तो विक्रमही मोडू, असाही दावा त्यांनी केला आहे.

मुलाखातीत शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव अतिशय वाईट होता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना नेहमीच माझा अपमान झाला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मला मंत्री म्हणून कामच करू देत नव्हते. माझ्या नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे सतत ढवळाढवळ करत होते. आदित्य ठाकरे हे MMRDA, Cidco आणि MSRDC च्या बैठका घ्यायचे. ही बाब मी उद्धव ठाकरे यांना कळवली पण पुत्रप्रेमामुळे त्यांनी काहीच केले नाही. असे शिंदे म्हणाले. तसे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप घाई झाली होती. पण उद्धव ठाकरेंना वाटलं त्यात माझा अडथळा असल्याचं त्यांना वाटलं'.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply