Eknath Shinde : वढु ग्रामस्थांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार, आज हाेणार माेठी घाेषणा?

Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी व्हावी अशी भावना वढु ग्रामस्थांची आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी आज (शनिवार) करावी अशी माहणी वढु ग्रामस्थांनी  केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ आणि स्मारकाच्या विस्तारीकरणाचा भुमिपुजन सोहळा आज वढु तुळापुर येथे हाेणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य लाेकप्रतिनिधी येणार आहेत.

Nagpur News : विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, तीन युवकांना 20 वर्षे सश्रम कारावास

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचा विकास यापुर्वी लोकवर्गणीतून झाला. आता राज्य सरकार माध्यमातुन होत असल्याचा अभिमान असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या साेहळ्यात स्थानिकांना सहभागी करुन घेतले नसल्याची खंत ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी व्हावी तशी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी करावी अशी भावना वढु ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना केली आहे.

काेल्हेंच्या मतदारसंघात महायुतीचे नेते

दरम्यान आज महायुतीतले चार प्रमुख नेते खासदार अमाेल कोल्हेंच्या होमपिच मैदानावर येणार असल्याने शिरुरचा दावेदार कोण अशी चर्चा रंगली आहे. पण ज्यांनी विकास केलाय त्यालाच जनता संधी देणार असे सुताेवाच ग्रामस्थांनी केलेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply