Eknath Khadse : भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...

Eknath Khadse : माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा परतणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. रविवारी रात्री खडसे अचानक दिल्लीत दाखल झाले, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. या सर्वांवर एकनाथ खडसेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा परतणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. रविवारी रात्री खडसे अचानक दिल्लीत दाखल झाले, त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. या सर्वांवर एकनाथ खडसेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

Ratnagiri Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी कन्फर्म? किरण सामंतांनी माघार घेतल्याची उदय सामंतांची माहिती

चर्चांवर स्पष्टीकरण देताना पुढे त्यांनी म्हटलं की, हा महत्त्वाचा निर्णय आहे. ज्या पक्षाने आपल्याला आतापर्यंत मदत केली आहे जर असा काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. या संदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून मी दिलेली नाही त्यामुळे तूर्तास तरी या प्रश्नांना कुठेतरी विराम द्यावं असं मला वाटतं.

जेव्हा मला पक्षात प्रवेश करायचा असेल त्यावेळी मी स्वतःहून तुम्हाला सर्वांना माहिती देईल, असंही खडसेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसेंना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतून रावेर लोकसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. एकनाथ खडसेंना किंवा रोहिणी खडसेंना या जागेवर उमेदवारी मिळाल्यास सासरे विरूद्ध सून आणि नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

मात्र या जागेवरून तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याचं एकनाथ खडसेंनी आधीच स्पष्ट केलं होतं. या काळात एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यात त्यांची दिल्लीवारी झाल्याने या चर्चांना आता आणखी उधाण आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply