Eknath Khadse : राज्यात शिंदे सरकारविरोधात आक्रोश; पुढचा मुख्यमंत्री... : एकनाथ खडसे

Eknath Khadse : राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. आश्‍वासने देऊन विविध समाजाची दिशाभूल या सरकारकडून होत असून, राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे.

आगामी काळात चांगला पर्याय म्हणून जनता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. ३) पक्षाच्या जिल्हा बैठकीत केला.

Maratha Reservation : आम्ही मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढू; अबू आझमींचं पुन्हा सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक जळगाव येथील आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी खडसे बोलत होते. 

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. आश्‍वासने देऊन विविध समाजाची दिशाभूल या सरकारकडून होत असून, राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे.

आगामी काळात चांगला पर्याय म्हणून जनता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. ३) पक्षाच्या जिल्हा बैठकीत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक जळगाव येथील आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी खडसे बोलत होते.  

आमदार चंद्रकांत पाटलांवरही निशाणा

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी आमच्या तालुक्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. शेतकरी कसा बदमाश आहे, हे दाखविण्याचा प्रकार त्यांनी केला. या आमदारांमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्‍यांना पीकविम्याची नुकसान भरपाई मिळत नाही.

कोळींसह तृतीयपंथीय आंदोलकांकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष

जळगाव येथे कोळी समाज आणि तृतीयपंथीयांचे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचा प्रकार तिन्ही मंत्र्यांनी केला आहे, असा आरोप खडसे यांनी केला.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply