Educational Breaking News : MPhilला मान्यता नाही! ताबडतोब प्रवेश देणं थांबवा; UGCचे विद्यापीठांना महत्वाचे निर्देश

Educational Breaking News : मास्टर्स इन फिलॉसॉफी अर्थात MPhil या डिग्रीला भारतात मान्यता नाही. त्यामुळं भारतीय विद्यापीठांनी या डिग्रीसाठी प्रवेश देणं तातडीनं थांबवावं असे निर्देश युजीसीनं विद्यापीठांना दिले आहेत. यामुळं ज्या विद्यापीठांनी असे प्रवेश दिले आहेत त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

युजीसीनं विद्यापीठांना निर्देश देताना म्हटलं की, आमच्या असं निदर्शनास आलं आहे की, काही विद्यापीठं फ्रेश अर्ज मागवत आहेत. त्यामुळं हे आम्हाला विद्यापीठांना लक्षात आणून द्यायचं आहे की, एमफील ही मान्यताप्राप्त डिग्री नाही.

Chandrapur News : राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत १० पट वाढ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

याबाबत अधिक माहिती देताना युजीसीचे सचिव मनिष जोशी म्हणाले, युजीसीच्या पीएचडीच्या रेग्युलेशन क्रमांक १४ मध्ये हे स्पष्टपणे म्हटलं आहे की, उच्च शिक्षण संस्थांनी एमफील डिग्रीसाठी प्रवेश देता कामा नये. त्यानुसार, युजीसीनं विद्यापीठांना आदेश दिलेत की त्यांनी २०२३-२४ या वर्षाकरीता एमफीलला प्रवेश देणं थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत.

दरम्यान, मनिष जोशी यांनी विद्यार्थ्यांना देखील सल्ला दिला आहे की, त्यांनी एमफीलसाठी कुठल्याही प्रकारे प्रवेश घेऊ नये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply