ED Raid: 'एकदाच आम्हाला गोळ्या घाला...' ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया; ६ तासांपासून चौकशी सुरू

Kolhapur : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापा मारला. गेल्या दोन महिन्यांत ईडीने दुसऱ्यांदा ही धाड टाकली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज ( ११ मार्च ) ईडीने पहाटे धाड टाकली. ईडीचे सात ते आठ अधिकारी पथकासह मुश्रीफांच्या घरी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरी तब्बल सहा तास ईडीचे अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. आबिद हसन मुश्रीफ आणि सायरा हसन मुश्रीफ यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू सुरू आहे.

ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. “समाजासाठी हसन मुश्रीफ एवढं काम करत आहेत. पण, असे असलं तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,” अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, धाडीची माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर मोठी गर्दी केली आहे. यावेळी ईडी आणि किरिट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी केंद्रीय आणि कोल्हापूर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा मुश्रीफ यांच्या निवास्थानाबाहेर तैनात करण्यात आला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply