Dussehra Melava 2023 : दसरा मेळाव्यासाठी ७५ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात, वाहतुकीतही बदल

Dussehra Melava 2023 : दसरा मेवाळा राज्यात मोठ्या उत्सहात साजरा केला जातोय. रावण दहनासह देवी विसर्जन आणि विविध कार्यक्रमांमुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. यासह पोलिसांचा मोठा फौजफाठा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलाय.

SVS रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक), केळुस्कर रोड, दादरमधील दक्षिण आणि उत्तर, दादरमधील एमबी राऊत रोड (एसव्हीएस रोडच्या जंक्शनपासून), दादरमधील पांडुरंग नाईक मार्ग, दादरमधील दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट प्रतिमा ते गडकरी जंक्शन), लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्रमांक ४ ते शितला देवी मंदिर जंक्शन), NC केळकर मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन) दादरमध्ये, ८- एलजे रोड, राजबाडे जंक्शन ते गडकरी जंक्शन. या रस्त्यांवर पार्किंग नसणारे.

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये पूल कोसळला, एकाचा मृत्यू; VIDEO आला समोर

पर्यायी मार्ग

सिद्धिविनायक जंक्शन एसके बोले रोड-आगर बाजार पोर्तुगीज चर्च आणि गोखले रोड, वैकल्पिकरित्या एलजे रोड- गोखले रोड-स्टील मॅन जंक्शन, वैकल्पिकरित्या, लोक राजा बडे जंक्शन मार्गे एलजे रोड. हे पर्यायी मार्ग आहेत.

मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या आझाद मैदान आणि शिवतीर्थवरील दसरा मेळाव्यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दसरा मेळावा, देवी विसर्जन आणि विश्वकपसाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये. यासाठी मुंबई पोलिसांनी बंदोबस्तासाठी ६ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी, १२ हजार ४४९ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणांवर राज्य राखीव पोलीस दलाच्या ३३ प्लाटून, शीघ्र कृती दल व गृहरक्षक दल तैनात करण्यात येणार आहेत. मध्य प्रादेशिक परिमंडळातील पोलिसांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. १०० अधिकारी, ६०० अंमलदार व राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ प्लाटून शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply