
Drought News : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहे. ज्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत हा पाहणी दौरा केला जाणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर, नाशिक ,नंदूरबार व जळगावमध्ये हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत.
केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले असून, आज आणि उद्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यात त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील काही तालुके व गावांमध्ये जाऊन हे पथक पाहणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या 11 गावांचा यात समावेश आहे.
|
|
धाराशिव जिल्ह्यात आज करणार पाहणी
केंद्राचे तीन सदस्यीय पथक आजपासून धाराशिव दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिली. शासनाने धाराशिव, वाशी व लोहारा तालुके तसेच अन्य तालुक्यातील 27मंडळे दुष्काळी घोषित केली आहेत. या अनुषंगाने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एक त्रिसदस्यीय पथक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हे पथक धाराशिव तालुक्यातील ताकविकी, करजखेडा, लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा बु, माळेगाव, धानुरी, तावशीगड येथे पाहणी करुन धाराशिवला परतणार आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन नंतर वाशी तालुक्यातील बोरी, वाशी, विजोरा व लोणखस शिवारात पाहणी करेल.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा दौरा
मराठवाड्यात आज पाहणी दौरा केल्यावर हे पथक उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या पाहणी करणार आहे. ज्यात, पुणे व सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. दोन वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून ही पाहणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण पाहणी दौरे संपल्यावर पुण्यात एक महत्वाची बैठक घेऊन अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
केंद्रीय पथकात यांचा समावेश...
केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के., सहसंचालक जगदीश साहू नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा पथकात समावेश आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

