Drought in Maharashtra : मोठी बातमी! राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये जाहीर केला गंभीर दुष्काळ

Drought in Maharashtra : राज्य सरकराने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ शासनाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर सरकारकडून १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य सरकारने गंभीर दुष्काळ आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्याने काही सवलतीही जाहीर केल्या आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, जमीन महसूल सूट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाची वसूली स्थगित, शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता असणार आहे.  

Pune News : मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर जाळपोळ; पोलिसांकडून ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल

तसेच या तालुक्यात आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, अशा स्वरुपाच्या सवलती राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, जालना, छ.संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने एकूण ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधीपक्ष नेते वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. ' सरकारने ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. सरकारने पुन्हा वस्तुस्थितीचा आढावा घेऊन कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

'सरकारने राज्यातील फक्त चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

'राज्यात निम्म्या जिल्ह्यात ५०% पेक्षा कमी पाऊस पडला. सोयाबीन पीक नष्ट झाले, रोगाने पिकाचे नुकसान झाले, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नाही, असे असताना फक्त चाळीस तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. शेतकरी हा सरकारच्या लेखी दिसत नाही. शेतकऱ्यांना मागच्या वर्षीच्या अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम सरकार करत आहे, असंही टीकास्त्र वडेट्टीवार यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply