DRDO scientist arrested: पुणे डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला एटीएसकडून अटक, पाकिस्तानला पुरवली संवेदनशील माहिती

Pune DRDO scientist arrested by ATS : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्या प्रकरणी पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसने अटक केली आहे.

संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या संचालकाने हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याचे स्पष्ट झालं आहे. निवृत्तीला ६ महिने राहिले असताना ते हनीट्रॅपमध्ये फसले आहेत. हे संचालक सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे.

हे संचाकल पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या (PIO) हस्तकाशी व्हॉटअॅप व्हाईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे. या प्रकरणी त्यांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. ०३/०५/२०२३ रोजी डी.आर.डी.ओ.चे हे संचालक पुणे येथील त्यांच्या कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना भारताचे शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या ( PIO) हस्तकाशी संपर्कात होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटअॅपद्वारे व्हाईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते पाकिस्तानच्या हस्तकाच्या संपर्कात राहिले.

डी.आर.डी.ओ.च्या या शास्त्रज्ञाने पदाचा गैरवापर करत कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे असलेली आणि भारताच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकेल अशी संवेदनशील माहिती शत्रु राष्ट्राला अनाधिकृतरित्या पुरवली. या प्रकरणी त्यांना महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणी आरोपी शास्त्रज्ञावर शासकीय गुपीते अधिनियम १९२३ कलम ०३ (१)(क), ०५(१) (अ), ०५ (१) (क), ०५ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट हे करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply