Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरांकडून दोन महिलांवर अत्याचार; दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड

DRDO Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून कुरुलकर यांच्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रदीप कुरूलकर यांनी दोन महिलांवर डीआरडीओच्या कार्यालयात अत्याचार केले आहे, असं एटीएसने आरोपपत्रात म्हटलं आहे.

डीआरडीओच्या  कामाचे टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कार्यालयात बोलवून त्यांच्यावर अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती एसटीएसने दिली आहे. या घटनेचा तपास सुद्धा सुरू असल्याचं एटीएसने सांगितलं आहे.

पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे. आहे. या हेरगिरी प्रकरणात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आरोपपत्र दाखल केलं आहे.

Kishor Aware Case : किशोर आवारे हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या

पाकिस्तानी हेरासोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटमध्ये त्यांनी अनेक भारतीय संरक्षण दलाची अनेक संवेदनशील माहिती दिल्याचे पुढे आले आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ता सोबत अनेक अॅपच्या माध्यमातून चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे. या चॅटिंगमध्ये कुरुलकर झारा दास गुप्ताचा उल्लेख 'बेब' करत असल्याच समोर आलं आहे. या चॅटिंगद्वारे कुरुलकरने भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, कुरुलकर यांची आणखी एक काळी कृती समोर आली असून डीआरडीओच्या कामाचे टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कार्यालयात बोलवून त्यांच्यावर अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती एसटीएसने दिली आहे. या घटनेचा तपास सुद्धा सुरू असल्याचं एटीएसने सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply