Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोठे झटके बसले आहेत. जगभरातील देशांना व्यापारासाठी धोका निर्माण करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणालाला अमेरिकेच्या फेडरल कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एलन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनापासून स्वत:ला दूर ठेवण्याची घोषणा केली. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना एकाच वेळी दोन हादरले बसले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कोऊ शकत नाही.', असे कोर्टाने सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जाणारे टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. त्यांनी संघीय नोकरशाही कमी करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण आता ते डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची सरकारी जबाबदारी सोडत आहेत. ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री अखेर तुटली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. आता एलन मस्क यांनी आपला निर्णय जाहीर केला.

डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांची जोडी अखेर तुटली. एलन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या म्हणजे DOGE चा एलन मस्क यांनी राजीनामा दिला. ट्रम्प सरकारने आणलेल्या 'वन बिग ब्युटीफुल बिल'मुळे एलन मस्क नाराज होते. त्यामुळेच ट्रम्प यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मस्क यांनी ते पद सोडण्याची घोषणा केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *