Donald Trump : गंभीर गुन्ह्यात दोषी ठरणारे ट्रम्प ठरले पहिले माजी अध्यक्ष; हश मनी प्रकरण नेमकं काय आहे?

Donald Trump : वॉशिंग्टन अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. हश मनी प्रकरणात कोटनि ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. एकूण ३४ आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा त्यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प गंभीर गुन्हेगारी प्रकरणामध्ये दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिली माजी अध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या इतिहासात असं यापूर्वी कधीच झालं नसल्याचं सांगण्यात येतं. जूरीने निर्णय घेण्याआधी १० तास यावर विचार-विमर्श केला. त्यानंतर आपला निर्णय दिला. डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकी काय शिक्षा होईल यावर ११ जुलै रोजी सुनावणी होईल. ट्रम्प हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार आहेत.


डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले वकील कोहेन यांच्या माध्यमातून पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्सला पैसे दिल्याचा आरोप आ त्यांचे गुपित उघड न करण्यासाठी हे पैसे दिल्याचं सांगितलं जातं. डोनाल्ड ट्रम्प हे २०१६ मध्ये अध्यक्षपदी निवडले जाण्याच्या आधीचं हे प्रकरण आहे. ट्रम्प यांचे वकील कोहेन हे त्यांच्याविरोधात गेले आहेत. १२ सदस्याच्या ज्यूरीने ट्रम्प प्रकरणात निर्णय दिला.

WI Vs AUS, Warm-Up Match : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा दणका; पूरनची 300 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

प्रकरण नेमकं काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये एका सेक्स स्कैंडल प्रकरणातून वाचण्यासाठी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते. सेक्स स्कैंडल समोर आल्यास त्याचा मोठा परिणाम त्यांच्या उमेदवारीवर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी गैरव्यवहार केल्याचं सांगितलं जातं.

डोनाल्ड ट्रम्प याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना चार वर्ष तुरुंगात राहावं लागू शकतं. अमेरिकेच्या सविधानानुसार गंभीर गुन्ह्यातील दोषी व्यक्तीला अध्यक्ष होता येत नाही. मात्र, याप्रकरणी ट्रम्प पुढच्या कोर्टामध्ये निर्णयाला आव्हाण देणार आहेत. त्यामुळे याप्रकरणी जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ते अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा विचार करु शकतात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply