Dombivli News : डोंबिवलीच्या पलावा सिटीतील टोलेजंग इमारतीला भीषण आग; आगीच्या ज्वाळा 8 व्या मजल्यावरून १८ व्या मजल्यापर्यंत

Dombivli News : डोंबिवलीतील पलावा सिटीमधील इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेली इमारत ही १८ मजल्याची असून आठव्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर गच्चीपर्यंत आग पसरलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली जवळील खोणी पलावा येथील ऑरेलिया इमारतीच्या सातव्या माजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सातव्या माळ्यावर बाल्कनीत ठेवलेल्या वॉशिंग मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.

 

Rohit Pawar : 45 कोटींचे विदेश दौरे, फडणवीसांच्या ओएसडीवर 1 कोटी 88 लाखांचा खर्च; रोहित पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

ही आग इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या डकमध्ये पसरली. डकमधून चार-पाच मजल्यापर्यंत ही आग गेली होती. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. इमारतीमधील रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. इमारतीच्या पुढील बाजूस असलेल्या डकमध्ये ही आग पसरल्याने फ्लॅटचे देखील नुकसान झालं नाही.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply