Dombivli Blast Case : डोंबिवली स्फोट प्रकरणाची मोठी अपडेट; अमुदान कंपनीच्या मालकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Dombivli Blast Case :  डोंबिवली स्फोट प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनीचा मालक मलय मेहताला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आज मलय मेहताला कोर्टात हजर करण्यात आलं. आज शनिवारी कोर्टाने मलय मेहताला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मलय मेहताला २९ जूपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी अमुदान कंपनीच्या मालकाला कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होत. त्यानंतर या प्रकरणी कंपनीच्या मालकाला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Chandrabhaga River Water Pollution चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी,आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर

अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर मालक मलय मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आईलाही कोर्टात करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने मलय मेहताला २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मलय मेहताची आई वयस्कर असल्याने त्यांना घरीच ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मलय मेहताच्या आईला पोलिसांनी नाशिक येथून पोलिसांनी अटक केली होती. आरोपी आणि जनहित याचिका टाकणाऱ्या वकिलांनी विविध गोष्टींवर युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं.

डोंबिवली ब्लास्ट प्रकरणातील ४२ जणांना डिस्चार्ज

डोंबिवली स्फोट प्रकरणाला पुन्हा दोन दिवस झाले आहेत. या स्फोटात ६४ जण जखमी झाले आहेत. तर यापैकी ४२ जणंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर २६ जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर १२ जण गंभीर अवस्थेत असून आयसीयूमध्ये दाखल आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी एनडीआरएफची टीम आणि अग्निशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

आज सकाळी देखील काही मानवी अवयवांचे अवशेष मिळाले आहेत. मात्र, जोपर्यंत सर्व बेपत्ता लोक मिळत नाही, तोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं एनडीआरएफ टीमकडून सांगण्यात येत आहे. घरातील सदस्य मिळत नाही, त्यासाठी कामगारांचे कुटुंब वणवण फिरत आहेत. तर काही नातेवाईक पोस्टमार्टम रुममध्येही शोध घेताना दिसत आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply