Dombivali News : डोंबिवलीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; ४ बार अँड रेस्टॉरंटला ठोकले सील

Dombivali News : पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. राज्यात अवैध्य पद्धतीने मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बारवर कारवाई करण्यात येत आहे. डोंबिवली शहरात सुरू असलेल्या ४ बार अँड रेस्टॉरंटला राज्य उत्पादन शुल्काने सील ठोकले आहेत.

बारमध्ये २५ वर्षाखालील तरुण-तरुणी दारू पीत असताना आढळून आल्याने एका बार वर कारवाई करण्यात आली आहे. इतर तीन बार आणि रेस्टॉरंटवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

Nashik News : कबूतर शर्यतीवरून वाद, नाशिकमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या; तीन संशयित ताब्यात

उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचे सत्र सुरूच राहणार, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यात अल्पवयीन मुलाकडून घडलेल्या हिट अँड रनच्या प्रकरनामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन तरुणाने दारू प्यायली होती. त्या पबवर कारवाई करण्यात आली आहे.

यानंतर संपूर्ण राज्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कारवाईचे सत्र सुरू झाले. डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी किरण सिंग पाटील यांनी सांगितले की, २५ तारखेपासून आतापर्यंत ४ बार अँड रेस्टॉरंट यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

या चारही बार रेस्टॉरंटला सील ठोकण्यात आले. यामध्ये कल्याण शेळ मार्गावर लगत असलेल्या इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड , गिरीश रेस्टॉरंट अँड बार, मयूर रेस्टॉरंट अँड बार आणि साई सिद्धी या बारचा समावेश आहे.

इंडिगो स्पाइस ड्रंक यार्ड या बारमध्ये वेळ संपल्यानंतरही लेडीज वेटर ची सर्व्हिस सुरू होती. त्यामुळे या बार वर कारवाई करण्यात आली आहे. गिरीश गिरीश रेस्टॉरंट अँड बार मध्ये 25 वर्षाखालील तरुण-तरुणी दारू पीत असताना आढळून आल्याने या बार वर कारवाई करण्यात आली आहे.

त्याचबरोबर मयूर आणि साई सिद्धी बार रेस्टॉरंट या बार मालकांनी त्यांच्या आयडीचे नूतनीकरण केले नसल्याने त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बार अँड रेस्टॉरंट तसेच ढाबा चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply