Dombivali News : डोंबिवलीत बिल्डर लॉबीची गुंडगिरी; रात्रीच्या अंधारात ७ घरांवर फिरवला बुलडोझर

Dombivali News : पोलीस आणि बिल्डर लॉबी संगनमत करुन गुंडगिरी करुन आम्हाला उद्धवस्त केल्याचा आरोप पीडित कुंटुंबीयांनी केलाय. तर याबाबत रामनगर पोलिसांनी या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून सखोल चौकशी केली जाईल सांगितले. दरम्यान रात्रीच्या अंधारात घरे का तोडली असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 

डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन परिसरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काही लोक मोठ-मोठ्याने बोलत होते, त्यांचा आवाज ऐकून परिसरातील घरातील लोक बाहेर पडले. मोठं-मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तींच्या हातात धारदार शस्त्र लाकडी दांडगे होते. त्यांच्यासोबत बुलडोझर होता. या लोकांनी घरात झोपलेल्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. बघता बघता ७ कुटुंबियाना घराबाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. नागरिकांच्या विरोधानंतर देखील ही घरे तोडण्यात आली.

Pune News : रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा; पुण्यातील प्रसिद्ध 'पब'वर पोलिसांची धडक कारवाई, २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

या घटनेनंतर रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पीडित कुटुंबातील व्यक्ती नंदू माने शार्दूल पाटील नावाच्या व्यक्तीने गुंड पाठवून हे अन्यायकारक कृत्य केले आहे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बेघर झालो आहोत. कुठे जाणार काय करणार असा सवाल केलाय. तर रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गणेश जवादवाड यांनी तक्रार आल्याचं सांगितलं. या प्रकरणाच चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *