Dombivali Crime : रेल्वे प्रवासात महिलांशी साधायची जवळीक; संधी साधत करायची हात साफ, महिला चोर पोलिसांच्या ताब्यात

Dombivali : भोळा भाबडा चेहरा बनवून रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांना या ना त्या बहाण्याने बोलण्यात गुंतवायचे. नंतर हातचलाखिने त्यांच्या पर्समधील मौल्यवान दागिने, रोकड चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वैशाली ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्या विरोधात याआधी देखील चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली.

रेल्वे प्रवासादरम्यान लोकल गाडीमध्ये महिलांच्या डब्यात गर्दीमध्ये महिलांना बोलण्यात गुंतवून ठेवायची. यानंतर गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने महिलांची पर्स व मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी लोकलमध्ये, प्लॅटफॉर्मवर गस्त वाढवत चोरट्यांचा शोध सुरु केला होता.

महिलांनी हटकले असता पळून जाण्याचा प्रयत्न

याच दरम्यान काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये काही महिलांना पर्समधील मोबाईल फोन, तसेच छोटे पर्स चोरी गेल्याचे लक्षात आले. यापैकी काही महिलांना एका महिलेची पर्स उघडी असल्याने त्या महिलेवर संशय आला. त्यांनी त्या महिलेला हटकले. मात्र ही महिला पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. याच वेळेस आरडाओरड केल्याने फलटावर गस्त घालत असलेल्या डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या संशयित महिलेस ताब्यात घेतलं.

महिला चोर रेकॉर्डवरील गुन्हेगार

तर पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे चोरी केलेला महागडा मोबाईल फोन, तसेच काही रोख रक्कम आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी केली असता तिचे नाव वैशाली सचदेव असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या विरोधात याआधी देखील रेल्वेत महिलांच्या डब्यामध्ये महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स मधून सोन्याचे दागिने, छोटे पर्स तसेच मोबाईल फोन, रोख रक्कम चोरी करण्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply