Dombivali : डोंबिवली हादरली! रिक्षा चालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार; अज्ञातस्थळी नेलं अन्...

Dombivali  : राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोंबिवलीत एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही गतीमंद महिला आपल्या नातेवाइकांकडे जात होती. यावेळी रिक्षाचालकाने तिला अज्ञात ठिकाणी नेऊन अमानुष कृत्य केलं.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी काही तासांत आरोपी फैजान खानला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply