Doctors On Strike : घाटी रुग्णालयाचे डॉक्टर संपावर; निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यानं संघटना संतापली!

Doctors On Strike : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टराला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण झाली होती. या मारहाणीत डॉक्टर जखमी झाला असून याचा निषेध करत डॉक्टर संघटना एकवटली आहे. संघटनेने संप पुकारला असून घाटी रुग्णालयातील डॉक्टर संपावर गेल्याने आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा कोलमडली आहे.  

घाटी रुग्णालय हे कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतं. कधीकाळी परिचारिकांच्या संपामुळे, कधी महिलांच्या सुरक्षेमूळे तर कधी डॉक्टर आणि नातेवाईकांच्या वादांमुळे. अश्यातच आजपासून पुन्हा एकदा डॉक्टरांनी संप पुकारला आहे. घाटी रुग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकानी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना आज समोर आली. रुग्णाला झोपेच्या गोळ्या देण्यात याव्या, ही मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली होती. मात्र झोपेच्या गोळ्या देता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ही मारहाण झाल्याचे पाहायला मिळाले.

Neet Result Controversy : नीट परीक्षेत गडबड झाली, सुप्रीम कोर्टात प्रकरण पोहोचल्यानंतर शिक्षण मंत्र्यांची कबुली

या प्रकारामुळे रूग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळं डॉक्टर संघटना प्रचंड आक्रमक झाल्याच पहायला मिळाल्या. रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर सर्वांनी एकत्र येऊन हे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. घाटी रुग्णालयातील सर्जरी विभागातल्या वार्ड क्रमांक १९ मध्ये ही घटना घडली. रुग्णावर नीट उपचार करत नसल्याची आणि दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानं ही मारहाण झाल्याच सांगण्यात आले. यामध्ये निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply