Dnyaneshwar Mhatre: विजयाच्या जल्लोषात आमदाराचाच खिसा कापला; ७५ हजार लंपास

विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) धुरळा काल उडाला. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीला धक्का बसला. मात्र, खरा धक्का म्हात्रे यांना बसला. विजयाच्या जल्लोषात त्यांचे ७५ हजार लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयी मिरवणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खिशातून पैसे चोरीला गेल्याची घटना घडली. ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा जल्लोष केला.यावेळी म्हात्रे यांना भेट देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं असता त्यांच्या समोरच्या खिशात असलेले 50 हजार रुपये आणि मागच्या खिशात असलेले 25 हजार रुपये असे एकूण 75 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरले.

जल्लोषादरम्यान म्हात्रे यांना पैसे गेल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांना गर्दीत व्यक्ती कोण होता हे समजले नाही. त्यांनी यासंदर्भात मतमोजणी केंद्रावरील पोलिसांना ताबडतोब तक्रार दिली. नवी मुंबई येथे सुरु असलेल्या विजयी जल्लोषादरम्यान हा प्रकार घडल्याचा संशय ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. कोकण शिक्षक मतदार संघात म्हात्रे यांचा विजय झाल्यानंतर बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी विजयी रॅली काढली. नवी मुंबईत सदर प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply