Diwali 2023 : ''फटाक्यांच्या बाबतीत प्रशासनाने गंभीर व्हायला हवं'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय?

Diwali 2023 : मुंबईमध्ये वाढत असलेलं हवेचं प्रदूषण आणि दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो याचिकेवरील सुनावणी सुरु आहे. त्यासंदर्भात कोर्टाने आज प्रशासनाला निर्देष दिलेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या फटाक्यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी काही राज्यांमध्ये सुरु आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात याबाबत काय अमलबजावणी सुरु आहे, याबाबत कोर्टाने महाधिवक्त्यांकडे विचारणा केली.

Nashik HAL : दिवाळी गिफ्ट! नाशिकच्या एचएएल प्रकल्पात प्रवासी विमानांची दुरुस्ती, देशातील पहिलाच प्रकल्प

महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश राज्यात लागू राहतील असं स्पष्ट करुन मुंबईतील प्रदूषणाबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे सध्या पावसामुळे हवेतील प्रदूषणाचं संकट निवळलं आहे. त्यामुळे मुंबईतील बांधकामांवर बंदी येण्याची शक्यता कमी आहे.

सुमोटो याचिकेमध्ये हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेला समिती नेमण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. समिती नियुक्त करुन ठोस मार्गदर्शक तत्त्वाची निर्मिती करण्यास सांगण्यात आलेलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कोर्ट नेमकं काय निर्णय देतं ते स्पष्ट होईल. फटाक्यांच्या बाबतीत प्रशासनाने गंभीर व्हायला हवं, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे दिवाळीतील फटाक्यांच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना येऊ शकतात. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply