Disha Salian Case : दिशा सालियनवर बलात्कार झाला नव्हता, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Disha Salian Case : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अशामध्ये दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दिशावर बलात्कार झाला नव्हता, असे या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दिशा सालियनवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाला नव्हता असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आला होता. दिशाच्या छातीवर आणि पोटावर खरचटल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. दिशाच्या हात-पाय आणि शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या हा उल्लेख पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Ambernath : टेम्पोच्या धडकेत नौदल निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद; फरार आरोपी अटकेत

दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० ला झाला होता. मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे दावा केला होता. पण दिशा सालियनच्या वडिलांना कोर्टात धाव घेत दिशाची बलात्कार करून हत्या केल्याचा दावा केला होता. पण आता दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण आले आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

- दिशाच्या हाताला, पायाला आणि छातीवर जखमा.

- दिशाच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर इजा.

- डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे दिशाचा मृत्यू.

- दिशाच्या नाकातून आणि तोंडातून रक्तही येत होते.

- दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार आणि बलात्कार झाला नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply