Dhule News : १०० हुन अधिक फटाके फोडणारे सायलेन्सर दाबले बुलडोजरखाली; धुळे पोलिसांची कारवाई

Dhule News : आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलडोझर धारकांवर कारवाई करत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. ही जप्त करण्यात आलेले सायलेन्सर पोलीस प्रशासनाकडून आज बुलडोजरखाली ठेवून नष्ट करण्यात आले. 

रस्त्यावरून जाताना कर्णकर्कश्य आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसवून मिरवणाऱ्या बुलेट धारकांवर गेल्या काही दिवसांपासून  पोलीस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता. या कारवाईदरम्यान जप्त केलेले जवळपास १०० हून अधिक सायलेन्सर आज पोलीस प्रशासनाच्या वतीने बुलडोझरच्या माध्यमातून नष्ट करण्यात आले आहेत.

NCP Crisis : शरद पवार गटाच्या आधी अजित पवार सुप्रीम कोर्टात! दाखल केली कॅव्हेट

धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरामध्ये आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जप्त करण्यात आलेले सायलेन्सर बुलडोझर खाली चिरडण्यात आले आहेत. कर्णकर्कश्य आवाज करत दहशत निर्माण करत तसेच दवाणी प्रदूषण केले जात असते. अशा वाहनधारकांवर यापुढे देखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply