Dhule News : अवैधपणे दारूची वाहतूक; ट्रकसह मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी केला हस्तगत

Dhule News : दारू विक्री करण्यास बंदी असताना अवैधरित्या वाहतूक व विक्री सुरूच आहे. अशाच प्रकारे मध्यप्रदेशकडून शिरपूर  तालुक्यातील बोराडी येथे अवैधपणे वाहतूक होत असलेल्या दारू साठ्यावर शिरपूर पोलिसांनी कारवाई करत दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. 

शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशकडून अवैधपणे वाहतूक करत मोठ्या प्रमाणात दारू साठा भरलेला ट्रक  शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी बोराडी परिसरामध्ये सापळा रचला असता त्या ठिकाणी संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला. ट्रक चालकाने पोलिसांना दुरूनच बघून ट्रक सोडून धुम ठोकली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांना आढळून आला.  

Maratha Reservation : मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

४९ लाखाचा दारूसाठा जप्त 

कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचे दारूचे बॉक्स या ट्रकमधून हस्तगत केले असून, जवळपास या ट्रकमध्ये ४९ लाखांहून अधिकचा दारू साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईत जवळपास ८० लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply