Dhule News : चिमुकल्याचा धरणात बुडून मृत्यू; शेळ्या चारण्यासाठी तिघे मित्र गेले होते धरणाच्या काठी

Dhule News : धरणात नावेवर बसून जात असताना, नाव अचानक डगमगू लागली. यानंतर तिघांनी पाण्यात उडी मारली. यातील दोघांना पोहता येत असल्याने ते बाहेर निघाले. मात्र आठ वर्षीय चिमुकल्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जामखेली (ता. साक्री) येथील धरणात घडली.

धंगाई(ता. साक्री) येथीलतीन मुले शेळ्या चारण्यासाठी आठवर्षीय बालक बालम विनोद देसाई व त्याचे मित्र दीपक साई व करण असे तिघे शेळ्या चारण्यासाठी धरणाकडे गेले होते. दरम्यान दुपारी तिघेजण नावेवर बसून धरणात गेले. धरणात नाव डगमगू लागल्याने तिघांनी घाबरून पाण्यात उडी मारली. यातील दीपक व करण यांना पोहता येत असल्याने ते काठावर आले. परंतु बालम पाण्यातच बुडाला.

Dhule Fire News : धुळ्यात फटाका गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

 सदर घटनेची माहिती वडील विनोद देसाई यांना मिळताच त्यांच्यासह गावातील काहीजण धरणावर आले. पोलिसांना  देखील या घटनेची माहिती देण्यात आली होती. गावकऱ्यांनी व पोलिसांनी बालम यास पाण्यात शोधले असता बालम आढळून आला. त्याला ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल केले असता, डॉ. मावची यांनी तपासून मृत  घोषित केले. विनोद देसाई यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात बालम देसाई याची अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply