Dhule News : अवैधपणे गांजाची वाहतूक; मुद्देमालासह दोघे पोलिसांच्या ताब्यात

Dhule News :  गांजाची लागवड व वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाया सुरूच आहेत. अशात धुळे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे.  चारचाकी वाहनातून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांच्या धुळे शहर पोलिसांनी लाखो रुपयांच्या गांजासह मुद्देमालासकट ताब्यात घेतले आहे.

धुळे शहर पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनातून मध्य प्रदेश येथून काही इसम अवैधपणे गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी  सापळा रचत मध्यप्रदेशकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीची तपासणी केली. यात गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

Satellite Toll System : सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टम काय आहे? हायवेवरून टोल प्लाझा होणार गायब, जाणून घ्या

गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी २१ किलो गांजा हस्तगत केला आहे. ज्याची बाजारामध्ये दोन लाख तेरा हजार रुपये इतकी किंमत मानली जात आहे. यासह या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांनी सहा लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *