Dhule News : तीन एकरावरील गांजाची शेती उध्वस्त; शिरपूर तालुक्यात पोलिसांची कारवाई

Dhule News : शेतात पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साधारण दोन ते तीन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या गांजाची शेती उध्वस्त केली आहे. 

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक धिवरे यांनी तात्काळ पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात जवळपास दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचीपर्यंत गांजाची लागवड केली असल्याचे पोलिसांना  आढळून आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सुका गांजा देखील बांधावरती पोलिसांना आढळून आला आहे.

Accident News : देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; कार-पिकअपच्या धडकेत ६ जण जागीच ठार

कोट्यवधींचा माळ जप्त 
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गांजाची ओली झाडे तसेच बांधावर सुकायला ठेवलेली झाडे असा जवळपास कोट्यावधी रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच गांजा लागवड करणाऱ्या संबंधितांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply