Dhule LCB Action : सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त; धुळे एलसीबीची कारवाई

Dhule LCB Action : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत नगावबारी परिसरात सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक, असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

सोनगीरकडू धुळ्यामार्गे ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरीलशहरातील नगावबारी शिवारात सापळा रचून संशयित ट्रकला ताब्यात घेतले. चालकाने त्याचे नाव शाहरुख खान नसीरखान (रा. रौनकाबाद, मालेगाव) असे सांगितले. 

Solapur News : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न; परिसरात गोंधळ; नेमकं काय घडलं?

७ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त 

ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला. कारवाईत ‘एलसीबी’ने ७७ हजार ७९२ रुपये किमतीच्या ८ गोण्या, १३ हजार ७२८ रुपयाच्या ८ गोण्या, २१ हजार ७८० रुपयाच्या ५ गोण्या, ९४ हजाराच्या १० गोण्या, ट्रक असा एकूण ७ लाख १५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *