
Dhule Crime News : जिल्हा पोलीस प्रशासनाने थर्टी फर्स्टला कारवाईचा बडगा उगारला. यात गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, गुटखा असा सुमारे एकूण 12 लाख 54 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे पोलिसांकडून एकाच दिवशी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल 328 कायदेशीर कारवाया केल्या असून यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 91 केसेस, मोटार वाहन कायद्यान्वये 117 केसेस दाखल झाल्या आहेत. या सोबतच शिरपूर शहर पोलिसांनी दोन गावठी पिस्टल पाच जिवंत काडतुस असा सुमारे 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
|
|
तळीरामांवर पोलिसांची कारवाई
दारूबंदी कायद्यान्वये तब्बल 99 केसेस पोलिसांनी दाखल केले असून यात एक लाख 61 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच जुगार कायद्यान्वये 19 केसेस दाखल करण्यात आल्या असून सुमारे अकरा हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लाख 24 हजार 640 रुपये किमतीचा गुटखा, आणि आठ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा सुमारे दहा लाख 24 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकाच दिवसात पोलिसांनी तब्बल 328 कायदेशीर कारवाया करून बारा लाख 54 हजार 235 रुपये किमतीची दंड रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.
एलसीबीने याआधीही जप्त केला गुटखा
मुंबई-आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत नगावबारी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक असा मुद्देमाल काही दिवसांपूर्वीच जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोनगीरकडून धुळ्यामार्गे ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील नगावबारी शिवारात सापळा रचून संशयित ट्रकला ताब्यात घेतले.
ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.कारवाईत ७७ हजार ७९२ रुपये किमतीच्या ८ गोण्या, १३ हजार ७२८ रुपयाच्या ८ गोण्या, २१ हजार ७८० रुपयाच्या ५ गोण्या, ९४ हजाराच्या १० गोण्या, ट्रक, असा एकूण ७ लाख १५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel
