Dhule Crime : एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी; दागिने घेऊन चोरटे पसार

Dhule Crime : धुळे शहराजवळ असलेल्या नगाव गावात चोरट्यांनी एकाच रात्री गावातील तब्बल ६ घरांना टार्गेट केले. यातील दोन घरांमधून चोरट्यांनी सोने- चांदीचे दागिने चोरुन नेले. मात्र उर्वरित चार घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नसल्याचे समोर आले आहे. 

शहरात होत असलेल्या घरफोड्यांचे सत्र आता ग्रामीण भागात गेले आहे. चोरट्यानी गावात देखील धाडसी चोरी सुरु केली आहे. त्यानुसार धुळे शहराजवळीत नगाव या गावात चोरट्यानी सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.  एकाच रात्रीत झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली व श्वान पथक त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. 

Bridge Collapse : बिहारमध्ये 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनापूर्वीच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ब्रीज कोसळला,

परिवार झोपले होते छतावर 
सध्या पावसाअभावी उकाड्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक घराबाहेर अथवा छतावर झोपत आहेत. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला व सदर घरांचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. त्यानंतर छतावर झोपलेल्या कुटुंबीयांपैकी काहीजण सकाळी खाली उतरले असता त्यांना घरात सर्वसामान अस्ताव्यस्त पडल्याच आढळून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
 

 

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply