Dhule Accident : ट्रकच्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

धुळे : शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचाकडून शिंदखेडाकडे जात असलेल्‍या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकला. यानंतर बाजूला रस्त्या किनारी असलेल्या घराजवळ उलटला. या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

शिंदखेडाकडे जात असलेल्‍या भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक रस्‍त्‍यावरील दुभाजकाला जावून धडकला. यावेळी रस्‍त्‍याच्‍या बाजूला उभ्या असलेल्या चौघांना या ट्रकने अक्षरशः चिरडले. यात दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आणखी एका पोस्टमनचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आणखी दोन जणांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या ट्रक चालकाला देखील गंभीर दुखापत झाल्याने मृतांची संख्या आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या झाडून हत्या

अपघाताची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य केले. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली व आयशर खाली अडकलेल्या महिलांना उपचारासाठी दाखल देखील करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी या दोघेही महिलांना मृत घोषित केल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply