Dhule Accident : अखेर चार दिवसांनी सापडला ट्रक; चालकाचा मृतदेह काढला बाहेर

धुळे : चार दिवसांपूर्वी शिरपूर येथील सावळदे येथील तापी नदीपात्रात बुडालेला ट्रक बाहेर काढण्यासाठी अखेर एनडीआरएफच्या पथकास पाचरण करण्यात आले होते. अथक प्रयत्‍नानंतर अखेर तापी नदीपात्रात बुडालेल्या ट्रकमधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. 

शिरपूर येथील सावर्दे पुलावर ट्रक व क्रुझरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ट्रक पुलाचा कथडा तोडून थेट नदीपात्रात कोसळला होता. चार दिवस होवून देखील ट्रक सापडलेला नव्‍हतो. यामुळे आज  एनडीआरएफच्या पथकास बोलाविण्यात आले होते. यामुळे ट्रक व त्‍यातील चालकाचा मृतदेह आढळून आला आहे.

नदीत बुडालेला ट्रक शोधण्यासाठी एचडीआरएफच्या जवानांना अपयश आले होते. यानंतर अखेर एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply