Anil Gote : रेस्ट हाऊसमधील कॅश प्रकरण राज्य शासनाकडून दाबण्याचा प्रयत्न; माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप

Dhule : रेस्ट हाऊसमध्ये आढळून आलेल्या कॅश प्रकरणासंदर्भात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयातून जबाब घेण्यासाठी येत असल्याचा निरोप आला होता. सोमवारी दुपारी बारा वाजता स्टेटमेंट घेण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु कुणीही आले नाही. मुळात राज्य शासनाने हे प्रकरण दाबवण्याचे ठरवले आहे; असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर १०२ मध्ये तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. सदरचे प्रकरण सध्या गाजत असून माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणात बोलताना धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणाबाबत राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क केला असून या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत पोलिस अधीक्षकाचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.

Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण

पोलिसांना पैसे असल्याची पूर्व माहिती होती? दरम्यान विधिमंडळ अंदाज समितीची बैठक घेण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय हे तीन शासकीय कार्यालयांचे सभागृह असताना भाजप आमदाराने हॉटेलमध्ये बैठक का घेण्यात आली? असा प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. तसेच पोलिसांना आत पैसे असल्याची पूर्व माहिती होती. म्हणून पोलिस येतानाच हातोडी न आणता पैसे मोजण्याचे मशीन का घेऊन आले? असा प्रश्न देखील गोटे यांनी उपस्थित केला आहे.

तर उच्च न्यायालयाचे दार ठोठावू दरम्यान सदरचे प्रकरण राज्य सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत अनिल गोटे यांनी हे प्रकरण आम्ही दाबू देणार नाही, मुम्बई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. जे आमदार आले होते, त्यांचे निलंबन करावे. तसेच या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply