Sakri News : अवकाळीने संसार उघड्यावर; पडलेले घर पाहून महिलेचे अश्रू अनावर

Dhule : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. जोरदार पाऊस आणि वादळी वारा असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेती पिकांचे नुकसान होण्यासोबत घरांची पडझड देखील होत आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्यातील मोहने गुंजाळ गावात घर पडल्याने संसार उघड्यावर आला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले असून हे दृश्य पाहून वृद्ध महिलेचे अश्रू अनावर झाले आहेत.

धुळे जिल्ह्यात देखील मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाची रोज हजेरी लागत आहे. साक्री तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या अवकाळी पावसासोबतच सोसाट्याचा वारा देखील असल्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या जनजीवनावर झाला असून या वादळी वाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी घरांची देखील पडझड झाल्याने बहुतांशी नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले आहे.

पडलेले घर पाहून महिलेचा आक्रोश

दरम्यान साक्री तालुक्यातील ग्रामपंचायत मोहने गुंजाळ गावातील सुरीबाई साधू अहिरे या वयोवृद्ध महिलेच्या घराची देखिल पडझड झाली आहे. हि वृद्ध महिला शेती कामासाठी बाहेर गेली असताना घराच्या भिंती कोसळल्या. यामुळे त्या बालंबाल बचावल्या आहेत. शेतातून घरी परतल्यानंतर महिलेने आपल्या घराची झालेली पडझड बघितल्यानंतर या महिलेचे अश्रू अनावर झाले असून ही वृद्ध महिला आपले नुकसान झाल्याचे बघितल्यानंतर ढसाढसा रडली आहे.

नुकसान भरपाईची मागणी

दरम्यान मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वृद्ध महिलेवर अवकाळी पावसामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. घर पडल्याने संसार उघड्यावर आला आहे. या संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत मोहानेचे लोकनियुक्त सरपंच जितू गावित यांनी या नुकसानीची पाहणी करत प्रशासनाकडे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply