Dhule Crime : धुळे हादरले; भर चौकात तरुणाचा खून, हेडफोन गिफ्ट देण्यावरून वाद विकोपाला

Dhule : अगदी शुल्लक कारणावरून धुळे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. हेडफोन गिफ्ट देण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. यातून धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात एका 27 वर्षीय तरुणावर हत्याराने वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. भर दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

धुळे शहरात भर दिवसा घडलेल्या या घटनेत गौरव किरण माने (वय २७) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात एका पान सेंटरसमोर गौरव किरण माने आणि मोबाईल सिम कार्ड विक्रेता स्टॉलधारक यांच्यात वाद झाला. हेडफोन गिफ्ट देण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. गौरव व स्टॉलधारक यांच्या निर्माण झालेल्या वाद विकोपाला गेला.

Samruddhi Mahamarg : पहाटे डुलकी लागली अन् जीव गमावला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

रस्त्यावर गाठत हल्ला

सदरच्या प्रकरणातील संशयित आरोपी जय राजेंद्र पाकळे व गौरव यांच्यात हा वाद होता. दरम्यान गौरव हा तालीमकडे जात असताना संशयित आरोपी जय पाकळे, ओम राजेंद्र पाकळे आणि राजेंद्र एकनाथ पाकळे यांनी त्याला अडवून संगनमताने हल्ला केला. जय पाकळेने चाकूसारख्या हत्याराने गौरवच्या पोटात वार केले. तर ओम पाकळेने लोखंडी हातोडीने मारहाण केली. या हल्ल्यात गौरवचा मृत्यू झाला आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

घटनेची माहिती धुळे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असून मारेकरींचा शोध घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply