Tuljapur News : शेतकऱ्याला मारहाण प्रकरण; अखेर पवनचक्की कंपनीसह १३ जणांवर गुन्हा दाखल

Dharashiva : पवनचक्की वादातून बीड येथील सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. हे प्रकरण ताजे असताना धाराशिवमधून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पवनचक्की गुंडांनी तुळजापुरात शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. शेतकऱ्याची २० गुंठे जमीन कंपनीने घेतली असताना ३५ गुंठा जमिनीवर पवनचक्की उभारणी केली जात होती. यावरून शेतकरी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला होता. यात शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी तुळजापुर पोलिसात कंपनीसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील बारुळ गाव शिवारात पवनचक्की उभारली जात आहे. यासाठी आवश्यक तेवढी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीकडून घेण्यात येत आहे. दरम्यान बारुळ गावातील सचिन ठोंबरे या शेतकऱ्याच्या शेतात पवनचक्की उभारी जात असून यासाठी सदर कंपनीकडून शेतकऱ्याची २० गुंठे जमीन घेण्यात आली होती. मात्र ३५ गुंठ्यावरती पवनचक्की कंपनीकडून कब्जा करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्याकडून पवनचक्की उभारणीला विरोध करण्यात आला.

Bhandara Mama Lake : भंडारा जिल्ह्यातील मामा तलाव मोजतोय अखेरच्या घटका; अतिक्रमण, देखभाल दुरुस्तीचा अभाव

शेतकऱ्याला करण्यात आली मारहाण

दरम्यान जादा जागेवर कब्जा करण्यात येत असल्याने शेतकरी व तेथील कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. यातून पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यात शेतकरी जखमी झाला होता. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखलही घेतली जात नसल्याचे ठोंबरे म्हणाले. तर पवनचक्की ठेकेदारांनी फोन केल्यावर पोलीस तात्काळ हजर होतात. काही तक्रार असेल तर पोलिसात तक्रार करा म्हणतात. मात्र पोलीस स्टेशनला दिवस दिवस थांबून घेतात पण गुन्हा दाखल केला जात नव्हता.

महिनाभरानंतर गुन्हा दाखल

शेतकऱ्याला मारहाण होण्याच्या घटनेला साधारण महिनाभराचा कालावधी उलटला आहे. यानंतर अखेर महिनाभरानंतर तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मारहाण करणारे दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम, जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply