Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिर संस्थानला सहा दिवसात १ कोटी ५९ लाखांचे उत्पन्न; ४० हजार भाविकांचे पेड दर्शन

Dharashiva : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव सध्या सुरू आहे. या नवरात्र उत्सवातील घटस्थापनेपासुन ते सहाव्या माळेपर्यंत हजारो भाविकांनी मातेच्या चरणी माथा ठेकला आहे. यामुळे मंदिर संस्थानला आतापर्यंत १ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

नवरात्रोत्सव (Navratri Festival) सुरु असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविक जात आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ व देवीच्या मंदिरांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी तुळजापुर हे एक पुर्ण पिठ असुन तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातुन भाविक येत आहेत. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे दर्शन घेण्याची सुविधा होती.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कायदेशीर नोटीस

तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी ऑनलाईन माध्यमातून ६०८ तर ऑफलाईन माध्यमातून ४२ हजार ३७५ भाविकांनी दर्शन घेतले आहे. तसेच भाविकांसाठी तात्काळ दर्शन घेण्यासाठी ३०० रुपयांचा पेड आणि ५०० रुपयांचा व्हीआयपी दर्शन पास घेवुन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यातुन तुळजाभवानी मंदीर संस्थानला सहा दिवसात १ कोटी ५९ लाख ६२ हजार ३०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply