Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात भरदिवसा गाेळीबार; वाळू माफियांच्या दाेन गटात राडा

Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात वाळू माफीयांच्या दाेन गटात तुफान राडा झाला. यावेळी काहींनी गाेळीबार देखील केला. या राड्यात दाेघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पुर्व वैमनस्यातून प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून घटनेचा तपास सुरु आहे.

परंडा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात आज (शनिवार) वाळु व्यावसायिकांच्या दोन गटात राडा झाला. यावेळी गोळीबार देखील झाला. योगेश हनुमंत बुरंगे याच्या कमरेला गाेळी लागली. त्यामुळे याेगेश गंभीर जखमी झाला.

Pandharpur Ashadhi Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विठ्ठलाचं दर्शन मिळणार २४ तास

याेगेश यास बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्यात कपील आजिनाथ अलबत्ते यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते देखील जखमी झाले आहेत. या घटनेतील संशयित आरोपी चैतन्य शेळकेसह दोघे जणांचा पोलिस शोध घेताहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *