Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

Dharashiv Crime News : धाराशिव शहर व ग्रामीण पोलीस हद्दीतील घरफोडीतील सराईत आरोपीला अटक करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. त्याच्याकडून एकूण ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दूसरीकडे तेरखेडा येथे धाराशिव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत विविध गुन्ह्यातील ६ संशयितांना ताब्यात घेतलेे. 

९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरासह ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासुन घरफोडीच्या अनेक घटना घडल्या. या गुन्ह्यातील सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर जिल्ह्य़ातील बार्शीतील रस्तापुर येथुन अटक केली.

Beed News : कर्जहमीच्या प्रस्तावात पंकजा मुंडेंच्या ‘वैद्यनाथ'ला स्थान नाही, मदतीपासून पुन्हा एकदा डावलले; समर्थकांमध्ये नाराजी

यामध्ये आरोपी संतोष भोसले याला ताब्यात घेत त्याच्याकडुन १४.१० ग्रॅम सोन्याचे दागिने व १० हजार रोख रक्कम असा एकुन ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. संबंधित आराेपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती एलसीबीने दिली.

पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथे धाराशिव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये विविध गुन्ह्यातील ६ संशयित

आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, सण उत्सव व जयंतीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये मालमत्तेसंबधी आरोपींचा तसेच विविध गुन्ह्यातील पाहीजे,फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी हे कोंबिंग ऑपरेशन राबवत ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply