Dhangar Reservation Chaundi : धनगर समाजाचं उपोषण मागे; मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश

Dhangar Reservation Chaundi: अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरु असलेलं उपोषण 21 व्या दिवशी थांबवलं आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला आज यश मिळालं आहे. 

सरकारच्या लेखी आश्वासनानंतर अखेर २१ दिवसांनंतर यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं उपोषण सोडले आहे. गिरीश महाजन आज उपोषणस्थळी दाखल झाले आणि सुमारे दोन तास उपोषणकर्ते आणि फोनवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा करून यातून तोडगा काढला.

बाळासाहेब दोलताडे, अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळाचे पाणी पिऊन उपोषण सोडले. यशवंत सेनेचे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हे उपोषण सुरु होते. यावेळी राज्य सरकारकडून दिल्या गेलेल्या आश्वासनांबाबत गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांना माहिती दिली.

Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी; जिंकलं 41 वर्षातलं पहिलं पदक

याआधी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत धनगर आरक्षणाबाबत चर्चाही झाली होती. मात्र ही चर्चा निष्फळ झाल्यानंतर आमरण उपोषण सुरू होते. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केल्यानंतर आज पुन्हा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन चौंडी येथे दाखल झाले आणि अखेर २१ दिवसांनंतर या उपोषणावर तोडगा निघाला.

विखे पिता-पुत्रांविरोधात घोषणाबाजी

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याबाबतची आंदोलनकर्त्यांमधील नाराजी दिसून आली. चौंडी येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये उपोषणकर्त्यांचा बरोबर चर्चा सुरू असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच खासदार सुजय विखे यांचा निषेध करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply