Devendra Fadnavis News : भारत हिंदू राष्ट्रच, हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भाजप नेत्यासह अयोध्येत दाखल होतील. लखनौमध्ये पोहोचल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं.

मला अतिशय मनापासून आनंद आहे की मला अयोध्येत येता आलं. एकीकडे शिवसेना भाजपचे नेते अयोध्या दौऱ्यावर आहेत. तर राज्यातील बळीराजा संकटात आहे. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यावर बोलताने फडणवीस म्हणाले की, विरोधकांचं टीका करण्याच कामच आहे. त्यांना आस्था नसेल आमची आस्था आहे.

प्रभू श्रीरामाने राज्यकारभार कसं चालवावं हे आपल्याला दाखवलं आहे. तसेच गांधींजींची देखील रामराज्याची संकल्पना होती. रामराज्याची संकल्पाना राबवायची असेल तर रामाचं दर्शन घेतलंच पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहातात. त्यामुळे तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, पण भारत हिंदू राष्ट्रच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना आम्हाला मान्य नाही या शरद पवारांच्या भूमिकेला फडणवीसांनी उत्तर दिलं. 

शिवसेना आणि भाजची युती 100 टक्के नैसर्गिक आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तर विचारांनी मिळते हेच एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply