Devendra Fadnavis : पुण्यात डबलडेकर पूल उभारून वाहतूक कोंडी सोडवणार; फडणवीसांनी सांगितला गडकरींचा पुढचा प्लान

Devendra Fadnavis : पुण्याच्या चौहीबाजूंनी वेगवेगळ्या शहरांकडे जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यांची कोंडी, यामुळेच पुण्याची वाहतूक कोंडी वाढते. सोलापूरहून पुण्याला येण्यासाठी दोन अडीज तास लागतात. पण पुण्याच्या जवळ आलं की, वाहतूक कोंडीमुळे तेवढाच वेळ शहरात येण्यासाठी लागतो. अशी सगळी कोंडी दूर करण्यासाठी डबलडेकर प्लाय ओव्हर तयार करण्याचा नितीन गडकरी यांचा प्लान आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फक्त डबलडेकर प्लाय ओव्हर नाही, तर एलिव्हेटेड रस्ते तयार करून त्या रस्त्याच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवायची अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा प्लान नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. राज्य सरकारच्या वतीने आम्ही देखील त्यांना आश्वासन देतो, की हा प्लान आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, जेणेकरून येत्या काळामध्ये वाहतुकीची कोंडी नसलेलं शहर म्हणून पुणे शहराची ओळख निर्माण करता येईल, असं देखील फडणवीसांनी सांगितलं आहे.

Chandani Chowk Flyover : पुणेकरांसाठी गुड न्यूज! चांदणी चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply