Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब! पोलिसांना धमकीचा फोन, कारण ऐकून बसेल धक्का!

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धकमी देण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला याप्रकरणी धमकीचा फोन आला आहे. रात्री दोन वाजता हा फोन आल्याची माहिती साम टिव्हीने दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा फौजफाटा रात्री तैणात करण्यात आला होता. धमकीचा फोन करणारा व्यक्ती कन्हान परिसरातील आहे. घरची लाईट गेली म्हणून संतापून त्याने पोलिसांना धमकीचा फोन केला आहे. 

दरम्यान नागपूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रात्री दोन वाजता कंट्रोल रूमला फोन आला की उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवाला, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर हा फोन कट झाला. यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क झाली. फडणवीस यांचे घरी बॉम्ब शोधक पथक पाठवण्यात आले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. पूर्णपणे तपासणी केली. 

ज्या परिसरातून हा फोन आला होता. याची तपासणी देखील पोलिसांनी केली. कन्हान या भागातून हा फोन आला होता. चौकशी केली असता त्याच्या घरची लाईट गेली होती. म्हणून त्याने रागात हा फोने केल्याचे पोलिसांना सांगितले. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *