Devendra Fadnavis : जयंतराव खोटं बोलायचं‌ तरी किती? देवेंद्र फडणवीस अचानक इतके आक्रमक का झाले ?

Devendra Fadnavis : आज महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटील यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवालातील आकड्यांवर चिंता व्यक्त केली आहे.

जयंत पाटील ट्वीट करून म्हणाले आहेत की, ''दरडोई उत्पन्नात क्रमांक १ वर असणारे आपले महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर गेले आहे. कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि शेजारचे गुजरात राज्यही आपल्या पुढे आहेत. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्र हा ५ व्या क्रमांकावर होता. आता आपल्या राज्याची घसरण ६ व्या क्रमांकावर झाली आहे. मधल्या काळात आपल्या राज्यातील जे प्रकल्प इतर राज्यात विशेषतः गुजरातला पाठवण्यात आले त्याचे परिणाम आपल्या महाराष्ट्राला भोगावे लागले हे यातून सिद्ध होते.''

Palghar Accident News : भरधाव ट्रेलरने पालघरमधील शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले; एकाचा मृत्यू, दाेघे गंभीर जखमी

जयंत पाटील म्हणाले आहेत की, ''राज्याच्या स्थूल उत्पन्नाचा वृद्धि दर जवळपास २% नी कमी झाला. तसेच कृषी व संलग्न क्षेत्राचा ग्रोथ रेट २.५% पेक्षा जास्त घटला आहे. सेवा क्षेत्रातील ग्रोथ रेट ४.२ टक्क्यांनी घटला आहे. महाविकास सरकारच्या तुलनेत राज्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच बालकांवरील गुन्हांमध्येही २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनुसूचित जाती घटक योजनांमध्ये २० टक्क्यांहून अधिक निधी खर्चच करण्यात आला नाही. एकंदरीत आज सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवाल हे स्पष्ट करतो की, महायुती सरकार आपल्या महाराष्ट्राला अधोगतीकडे लोटण्याचे काम करत आहे.''

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जयंत पाटील यांच्या आरोपांवर उत्तर देतानादेवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''जयंतराव, खोटे बोलायचे तरी किती? बाकीच्यांनी खोटा नरेटिव्ह पसरविला, तर समजू शकते. पण, दस्तुरखुद्ध राज्याचे माजी अर्थमंत्री तेच करीत असतील, तर काय म्हणावे?''

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दरडोई उत्पन्नाबद्दल माहिती देताना फडणवीस यांनी काही आकडेवारी ट्वीटवर शेअर केली आहे. जी खालीलप्रमाणे आहे...

मविआ सरकार

2020-21 : 1,82,454 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

2021-22 : 2,19,573 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

महायुती सरकार

2022-23 : 2,52,389 दरडोई उत्पन्न (महाराष्ट्र सहावा)

ही आकडेवारी शेअर करत फडणवीस म्हणाले की, ''आपल्या बाकीच्याही आरोपांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलतीलच. पण, महाराष्ट्राची बदनामी किमान आपल्या हातून तरी होऊ नये, ही अपेक्षा.'' फडणवीस यांच्या ट्वीटला पुन्हा जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस यांच्या ट्वीटला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ''देवेंद्रजी, मोठ्या व मध्यम राज्यांमध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या २-३ मध्ये असायचा. भाजपची राजवट २०१४-१५ ला आली व आपण मुख्यमंत्री झालात फक्त २ वर्षात २०१७-१८ मध्ये गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला व तो कायम पुढे राहिला आहे व हा NARRATIVE नाही तर ही अख्या महाराष्ट्राची खरी खंत आहे.''

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply