Devendra Fadnavis :'राज्यात भाजपला जनतेने नाकारलं नाही, तर...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पराभवाची कारणे

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुक २०२४ च्या निकालात राज्यात भाजपला चांगलाच दणका बसला आहे. राज्यात भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पराभवाची कारणे सांगितल्याचं समोर आलं आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात भाजपने जनतेला नाकारलेलं नाही, तर समसमान मतं पडली आहेत.

राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. तर संविधान बदलनार या नरेटीव्हचा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर कांदा प्रश्नाचा देखील परिणाम झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे भाजपला फटका सहन करावा लागला आहे. काही ठिकाणी कांद्याचा, तर काही ठिकाणी सोयाबीन आणि कापूसचा देखील प्रश्न होता. संविधान बदलणार, ही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात कमी पडल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Shirur Accident : पुणे- नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू

लोकसभा निवडणुकांचे काल निकाल आले. देशभरातील भाजपच्या  कार्यकर्त्यांचे देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले आहेत. पंडित नेहरूनंतर पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याचा मोदींना आशीर्वाद दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर आडिसामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वात सरकार बनणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील एक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
 
इंडीया आघाडीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळालेल्या आहेत. भाजप आणि एनडीए घटक पक्ष मिळून सरकार बनणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचंही स्वागत फडणवीसांनी केलं आहे. महाविकास आघाडीला राज्यात 2 लाख मते जास्त मिळाल्याचं फडणवीस म्हटले आहेत. माझी जबाबदारी आहे, मी कुठेतरी कमी पडलो असं म्हणत फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply