Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपयांचा फायदा, भरसभेत फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी  महत्वाची बातमी समोर आलीये. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव पडल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आचारसंहिता लागल्याने ते पैसे खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिलीये. काल राळेगाव (यवतमाळ) येथील सभेत उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती दिली.

Eknath Shinde Interview : मविआ सरकारने भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं होतं; CM एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

उपस्थितांना संबोधत करताना फडणवीसांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले. तर राज्य सरकारने देखील ६ हजार रुपये दिले. जगभरात काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. रशिया -युक्रेन युद्ध, इरान - इस्रायल युद्ध त्यामुळे कापसावर निर्बंध आले. परिणामी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले.

शेतकऱ्यांचं होणरं नुकसान पाहता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ४००० कोटीरुपये देण्यात येणार आहे. आचारसंहिता संपल्यावर जो काही फरक पिकांच्या किंमतीत असेल त्यानुसार त्या त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे तुमचं, सामान्य माणसाचं आणि गोरगरिबांचं सरकार आहे, असं देखील फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलंय. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्वच मोठ्या नेत्यांनी प्रचार सभांवर जोर दिलाय.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिलीये. तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे राजश्री पाटील आणि संजय देशमुख या दोघांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply