Devendra Fadanvis News : 'OBC नेत्यांना संपवण्यासाठी २५ पक्ष एकत्र, विरोधकांमुळे समाजात तेढ...' देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadanvis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये त्यांनी ओबीसी जागर यात्रेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी राजकीय पोळी भाजून घेण्याकरिता देशातल्या ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये.. अशा शब्दात कॉंग्रेसवर घणाघात केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

वाशिमधील ओबीसी जागर यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी 25 पक्ष एकत्र असे म्हणत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच विरोधी पक्षांमुळेच जातीय तिढा वाढत आहे, विरोधक जाती जातींमध्ये भांडणे लावत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Political News : पुण्याचे पालकमंत्रिपद देणे म्हणजे मोठ्या कामासाठी छोटी तडजोड; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

कोणाचेही आरक्षण कमी न करता निर्णय घेणार..

"कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिला होता त्याच प्रकारे मराठा आरक्षण करतात आमचं सरकार कटीबद्ध आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कंबर कसली आहे आणि निश्चितपणे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आमचं सरकार थांबणार नाही," असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

ओबीसींच्या विकासासाठी कटीबद्ध...

यावेळी बोलताना फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी कटीबद्ध असल्याचेही आश्वासन दिले. ओबीसी आणि VJNT साठी आम्ही 30 जिआर काढले आहेत. ज्या ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहमध्ये जागा मिळाली नाही. तर आम्ही स्वधारच्या माध्यमातून त्याची व्यवस्था करतो आहे. पुढच्या 3 वर्षात 10 लाख घर ओबीसी आणि VJNT साठी बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.. अशी माहिती फडणवीसांनी दिली. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply