Dengue Patients : धाराशिवच्या पांगरदरवाडीत डेंग्यूची साथ; महिनाभरात २५ रुग्ण पॉझिटिव्ह

Dengue Patients : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे डेंग्यूच्या साथ रोगाने थैमान घातले आहे. गेल्या महिभरापासून या गावात डेंग्यूचे तब्बल २५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर आला आहे. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी गावात उपाय योजना करण्यास सुरवात झाली आहे.

मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यामुळे दवाखान्यात देखील रुग्णांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. इतकेच नाही तर वातावरणामुळे डासांची उत्पत्ती देखील होत असून डेंग्यूसारखे आजार डोके वर काढत आहेत. यामुळेच धाराशिवच्या पांगरदरवाडी गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. 

NCP News : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आतापर्यंत काय घडलं?

मागील महिनाभरात गावात २५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असुन डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घाडगे यांच्या पथकाने गावात येऊन पाहणी केली. तसेच गावात आरोग्य विभागाची एक टीम ताल ठोकून आहे. डेंग्यू साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सूचना दिल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply