Dengue Patient : नाशिकमध्ये महिनाभरात डेंग्यूचे १६१ बाधित रुग्ण; एका संशयित रुग्णाचा मृत्यू

Dengue Patient : जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा असताना नाशिकमध्ये मात्र डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. जून महिन्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे १६१ बाधित रुग्ण आढळून आले. तर एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. 
 
पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार डोके वर काढत असतात. तर पावसाच्या पाण्याचे डबके साचून, किंवा इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असते. डेंग्यूच्याअळ्या निर्माण होऊन या डासांमुळे डेंग्यूचा फैलाव होत असतो. नाशिकमध्ये  जानेवारी ते मे या पाच महिन्यात डेंग्यूचे अवघे ११० रुग्ण आढळले असताना जून महिन्यात मात्र अचानक डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर एका संशयित रुग्णाचा देखील मृत्यू झालाय. 

रुग्णांचा केवळ सरकारी आकडा  

विशेष म्हणजे १६१ बाधित रुग्ण हे केवळ सरकारी आकडा असून प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली असून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेने नोटिसा आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.  

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply